चला सोपा करूया परिपाठ
*दिवस 132 वा*
माझा संपूर्ण शैक्षणिक प्रवास.... Green yatra present Unsung Heroes
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आजचे पंचांग
तारीख -
२१ डिसेंबर २०२३
वार:-गुरूवार
तिथी:-मार्गशीर्ष शु ९ शके १९४५
शिवराज शक 350
अयन-दक्षिणायण
ऋतू - शरद ऋतू
मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलाखर "
Today's almanac
Date - 21 December 2023
Thursday
Tithi-Margshirsh Shu 9 shak 1945
Ayana-Dakshinayana
Season:-Autumn season
"Jamadilakhar" month of Muslims
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
गुरुवार, 21 डिसेंबर 2023
सूर्योदय 07:07,
खगोलीय दुपार: 12:36,
सूर्यास्त: 18:06,
दिवस कालावधी: 10:59,
रात्र कालावधी: 13:01.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सुविचार
“जो मनाला जिंकतो तो जगालाही जिंकू शकतो.”
Good Thought
"He who conquers the mind can conquer the world."
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
*दिनविशेष*
१९०९: अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांचा गोळ्या घालून वध केला.
१९१३: ऑर्थर वेन यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे (Crossword Puzzle) न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले.
१९६५: विच्छा माझी पुरी करा, या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला.
१९८६: रघुनंदन स्वरुप पाठक यांनी भारताचे १८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
*आजची म्हण व अर्थ*
अंथरूण पाहून पाय पसरावे - आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.
cut your coat according to your cloth
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
कोडे
जर का तुमच्या कडे २ गाय आणि ४ बकऱ्या असतील तर तुमच्या कडे एकूण किती पाय आहेत?
=>उत्तर – २
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
*सामान्य ज्ञान प्रश्न*
1 भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरु झाली?
उत्तर:- कोलकत्ता
2 कोणत्या जीवनसत्वाअभावी मनुष्यास रातअंढाळेपणा हा रोग होतो ?
उत्तर:- अ जीवनसत्व
3 भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहलेल्या असतात?
उत्तर 17
4 कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो?
उत्तर:- अमोनिया
5 चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता?
उत्तर :-चीन
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
*बोधकथा*
*गर्विष्ठ मोर*
एक मोर होता. तो फार बढाईखोर होता. स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता. तो दररोज नदीकिनारी जायचा. पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून, स्वतःच्या सौंदर्याची स्तुती करायचा.
मोर म्हणायचा, "माझा डोलदार पिसारा पहा! त्या पिसर्यावरील मोहक रंग पहा!! माझ्याकडे पहा! जगातील सर्वात सुंदर पक्षी मीच आहे.
एकेदिवशी मोराला नदीकिनाऱ्यावर एक करकोचा दिसला. मोराने त्याच्याकडे पाहून आपले तोंड फिरवले. आणि तुच्छतेने करकोच्याला म्हणाला, "किती रंगहीन आहेस तू! तुझे पंख पांढरे फटक आणि निस्तेज आहेत."
करकोचा म्हणाला, "मित्रा, तुझा पिसारा नक्कीच सुंदर आहे. माझे पंख तुझ्या सारखी सुंदर नाहीत. पण म्हणून काय झालं? तुझ्या पंखांनी तू उंच उडू शकत नाहीस. मी मात्र माझ्या पंखांनी आकाशात उंच उडू शकतो. "एवढे बोलून करकोचा ने आकाशात झेप घेतली. मोर मात्र खजील होऊन त्याच्याकडे पाहत राहिला.
तात्पर्य (moral): दिखाऊ सौंदर्यापेक्षा उपयुक्तता महत्त्वाची असते.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
श्लोक
स्वगृहे पूज्यते मूर्खः स्वग्रामे पूज्यते प्रभुः।
स्वदेशे पूज्यते राजा विद्वान्सर्वत्र पूज्यते।।
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा