डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शालेय परिपाठ दिवस 137 वा

 चला सोपा करूया परिपाठ

*दिवस 137 वा*


डिजिटल समूहासाठी कोरोना काळातील विद्यार्थ्यांना मोफत चित्रकला क्लास घेणारे शिवराज सर अभिनेता विकी कौशलला त्यांचे चित्र भेट देतांना....


शालेय परिपाठ 

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

तारीख -२८ डिसेंबर २०२३

वार:-गुरूवार

तिथी:-मार्गशीर्ष कृ २ शके १९४५

 शिवराज शक 350

अयन-उत्तरायण

ऋतू - हेमंत ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलाखर "


Today's almanac

 Date - 28 December 2023

         Thursday

 Tithi-Margshirsh krushna 2 shak 1945

 Ayana-Uttrayana

 Season:-pre-winter season


"Jamadilakhar"  month of Muslims 


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

 गुरुवार, 28 डिसेंबर 2023

सूर्योदय 07:05, 

खगोलीय दुपार: 12:36, 

सूर्यास्त: 18:07, 

दिवस कालावधी: 11:02, 

रात्र कालावधी: 12:58.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सुविचार

नेहमी तीन गोष्टी देत राहा. मान, ज्ञान, आणि दान.


Good thought

“The way to get started is to quit talking and begin doing.” – Walt Disney

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

दिनविशेष

हुतात्मा शिरीशकुमार यांचा जन्म 1926


म्हणी/proverb

Money makes the mare go.

दाम करी काम

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोडे

चिरून धुतले भाजीला तर आम्ही विरघळतो पाण्यात

होते कमी  पोषकता भाजी ची

काही क्षणात

ओळखा पाहू मी कोण?

:-क्षार व जीवनसत्वे

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

बोधकथा

एकदा एक श्रीमंत माणूस नदी काठावरील मंदिरात देव दर्शनासाठी गेला. अचानक त्याच्या मनात आले, नदीत जाऊन हात-पाय धुवावेत व मग मंदिरात देव दर्शनासाठी जावे. तो नदीवर गेला. हात-पाय धूत असताना त्याचा तोल गेला आणि तो नदीत पडला. त्याला पोहता येत नव्हते. त्याची धडपड सुरु झाली .तो ओरडू लागला पण त्याला वाचवण्यासाठी कुणीही पुढे येईना. 

अखेर एका साधूने त्याला वाचविले. काठावर आणले. काही वेळाने तो श्रीमंत गृहस्थ भानावर आला. त्याने खिशातून खूप नोटा बाहेर काढल्या. पण त्यातील फक्त एक रुपयाची नोट साधूच्या हातावर ठेवली. हे पाहून काठावर जमलेले लोक संतापले. त्यांनी त्या व्यापाऱ्याला  उचलले व नदीत टाकणार इतक्यात साधूने त्यांना थांबविले.

साधू म्हणाला, 'थांबा, त्याने स्वतःच्या किमती एवढेच बक्षिस दिले आहे. यात त्याची काय चूक? त्याची किंमत एवढीच आहे.'

"माणसाची खरी किंमत प्रसंगानेच कळते. उपकार कर्त्याचे उपकार स्मरणे हेच माणसाचे कर्तव्य आहे."

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सामान्य ज्ञान (संकलन ज्ञानराज दरेकर)

०१) कोल्हापूर ते रत्नागिरी दरम्यान असलेला घाट कोणता ?

- आंबा घाट.


०२) उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- बुलढाणा.


०३) महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या दृष्टीने भारतात कितवा क्रमांक आहे ?

- दुसरा.


०४) महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात कितवा क्रमांक लागतो ?

- तिसरा.


०५) बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत ?

- पाच.


General Knowledge ( by Dnyanaraj Darekar)

 01) Which is the Ghat between Kolhapur and Ratnagiri?

 - Mango Ghat.


 02) In which district is Lonar Sarovar formed due to meteorite?

 - Buldhana.


 03) What is the number of Maharashtra in terms of population in India?

 - Second.


 04) What is the number of Maharashtra in terms of area in India?

 - the third.


 05) Out of twelve Jyotirlingas, how many Jyotirlingas are there in Maharashtra?

 - Five.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

श्लोक

न चोरहार्य न राजहार्य न भ्रतृभाज्यं न च भारकारि।


व्यये कृते वर्धति एव नित्यम विद्याधनम सर्वधनप्रधानम्।।


अर्थ:- ते चोरल्या जाऊ शकत नाही, राजा तुमच्याकडून काढून घेऊ शकत नाही, भाऊबंदकी मध्ये विभागले जाऊ शकत नाही आणि त्याचे कधीही ओझे वाटत नाही.

उलट इतरांना दिल्याने ते नेहमीच वाढत राहते असे विद्याधन हे सर्वश्रेष्ठ धन आहे.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚