शिक्षक खरोखर मुख्यालयी राहतात का? 30 नोव्हेंबरपर्यंत अहवाल पाठवा
जि.प. सीईओंच्या आदेशानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून कार्यवाही सुरू...
राम शिनगारे यांच्या धारदार लेखणीतून....
लोकमत न्यूज नेटवर्क (सौजन्य)
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मुख्यालयी(shikshak mukhyalay)राहतात की नाही, याविषयीचा अहवाल सादर करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व केंद्रप्रमुखांना दिले आहेत. त्यानुसार केंद्रप्रमुखांना शिक्षकांकडून माहिती भरून घेत ३० नोव्हेंबरपर्यंत गटशिक्षणाधिकारी कार्यालयास सादर करावी लागणार आहे. ऐन दिवाळीत सुरू झालेल्या नव्या मोहिमेमुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना यांनी २० ऑक्टोबर रोजी कचनेर तांडा नंबर दोन येथील प्राथमिक शाळेला सकाळी दहा वाजता भेट दिली होती. त्या शाळेच्या तपासणीत एकही शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याचे निदर्शनास आले. तसेच भेटीदरम्यान गावच्या सरपंचांनी एकही शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याची बाब सीईओंच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार सीईओंनी जि.प. शाळेतील शिक्षक मुख्यालयी राहत आहेत किंवा नाही, याबाबत खात्री करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केंद्रप्रमुखांना आदेश देत शिक्षक मुख्यालयी राहतात की नाही, याबाबतचा स्वयंस्पष्ट अहवाल ३० नोव्हेंबरपर्यंत पं.स. कार्यालयात सादर
करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार शिक्षक मुख्यालयी राहत असल्याचे पुरावे २० ऑक्टोबर २०२३ नंतरचे असावेत, असेही स्पष्ट केले.भाजपचे गंगापूर विधानसभेचे आ. प्रशांत बंब यांनी दोन वर्षांपासून हा मुद्दा उचलून धरलेला आहे. ते सातत्याने शिक्षक मुख्यालयी राहण्याविषयीची मागणी लावून धरीत आहेत.shikshak mukhyalay
संघटनेच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया अवश्य पहा...
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा