डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शालेय परिपाठ दिवस 147 वा | school assembly |

 चला सोपा करूया परिपाठ

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

 दिनांक.०९/०१/२०२४ 

भारतीय सौर १८, पौष शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.

वार:- मंगळवार

अयन-उत्तरायण

ऋतू - हेमंत ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलाखर "

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

Today's almanac

Date 09/01/2024

 Indian Solar 18, Paush Shaka 1945 (This date is according to Indian Solar Calendar which is the official calendar of India. This information will be given from today.

 Day:-Tuesday

 Ayana-Uttarayana

 Ritu - Hemant Ritu

 The holy month of Muslims "Jamadilakhar"


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

मंगळवार, 09 जानेवारी 2024

सूर्योदय 07:09, 

खगोलीय दुपार: 12:41, 

सूर्यास्त: 18:14, 

दिवस कालावधी: 11:05, 

रात्र कालावधी: 12:55.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सुविचार

जीवन फुलासारखे असू द्या पण ध्येय मात्र मधमाशी प्रमाणे ठेवा.


Good Thought

Education Prepares You for the Future. ...

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

दिनविशेष

१८८०: क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना देशद्रोहाच्या आरोपावरुन जन्मठेपेची शिक्षा


१९१५: महात्मा गांधींचे अफ्रिकेतुन भारतात आगमन


१९८२: ला भारताचा पहिला शास्त्रज्ञ वर्ग अंटार्क्टिकाला पोहचला.


२००१: नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले


जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८३१: फातिमा शेख : भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका


१९२२: हर गोविंद खुराना – जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०११)

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

special day

 1880: Revolutionary Vasudev Balwant Phadke sentenced to life imprisonment on charges of treason


 1915: Mahatma Gandhi arrived in India from Africa


 1982: India's first group of scientists reached Antarctica.


 2001: The first  lunar eclipse of the new millennium was observed


 Birthday / Jubilee / Birthday:

 1831: Fatima Shaikh: India's first Muslim woman teacher


 1922: Har Gobind Khurana – Indian-born American Nobel laureate (died: November 9, 2011)


 🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

आजची म्हण व अर्थ

असंगासी संग आणि प्राणाशी गाठ - दुर्जन माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो.


Proverb

Doing is better than saying -क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोडे

अशी कोणती गोष्ट आहे जी बोलल्यानंतर तुटून जाते?


=> शांतता

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

बोधकथा


घुबड आणि टोळ

एक म्हातारे घुबड झाडाच्या ढोलीत झोपले असता एका टोळाने झाडाखाली गाणे म्हणायला सुरुवात केली. त्याने गाणे म्हणू नये म्हणून घुबडाने त्याला विनंती केली, बाबा रे, तू येथून जा, मला विनाकारण त्रास देऊ नकोस. तुझ्या किरकीरीने माझी झोप मोडते.' यावर तो टोळ त्या घुबडाचा धिक्कार करून त्याला शिव्या देऊ लागला. तो म्हणाला, 'तू लबाड, चोर आहेस, रात्रीचा बाहेर जाऊन चोरी करून पोट भरतोस नि दिवसा झाडाच्या ढोलीत लपून बसतोस.' त्यावर घुबड म्हणाले, 'अरे तू आता आपलं तोंड सांभाळ, नाहीतर मग पस्तावशील.' तरीही टोळ ऐकून घेईना. घुबडाची निंदा करून तो पुन्हा गाऊ लागला, मग घुबडाने त्याची खोटी स्तुती करायला सुरुवात केली, 'बाबा रे, क्षमा कर. तुझं गायन अगदी गोड आहे. माझ्या इतका वेळ ते लक्षात आलं नाही. तुझ्यासारखा गाणारा तूच. तुझ्या गाण्यापुढे कोकीळाही लाजेल. तुझा स्वर सारंगीपेक्षा चांगला आहे. बरी आठवण झाली. माझ्याकडे एक अमृताची कुपी आहे. त्यातले थोडेसं मी तुला देतो. फार वेळ गात राहिल्याने तुझा गळा अगदी सुकून गेला असेल नाही का ?' टोळाला खरोखरच तहान लागली होती, तो घुबडाजवळचे अमृत घेण्यासाठी त्याच्याजवळ गेला. लगेच घुबडाने त्याला उचलून आपल्या तोंडात टाकले.


तात्पर्य


- आपल्याला जे आवडते ते सर्वांनाच आवडेल असे नाही, हे लक्षात घेऊन दुसर्‍याच्या आवडीनिवडीचा जे विचार करीत नाहीत ते शेवटी आपला नाश करून घेतात.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सामान्य ज्ञान

(१)कोणत्या ग्रहाची परिवलन व परिभ्रमण या दोन्ही गती जवळपास सारख्याच आहेत ?

=शुक्र


(२) सर्वप्रथम आकाशगंगेबाबत भाकित करणारा खगोलशास्त्रज्ञ कोण ?

=हर्षल


(३) सूर्याचे प्रकाशकिरण पृथ्वीवर पोहोचायला किती मिनिटे लागतात?

=८ मिनिटे १६ सेकंद


(४) चंद्रावरून प्रकाशकिरण पृथ्वीवर पोहोचायला किती वेळ लागतो ?

=१.३ सेकंद


(५) सूर्यापासून सर्वांत जवळ असलेला ग्रह कोणता ?

=बुध

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

general knowledge

 (1) Which planet's orbit and rotation speed are almost same?

 = Venus


 (2) Who was the first astronomer to predict the galaxy?

 = Harshal


 (3) How many minutes does it take for the sun's rays to reach the earth?

 = 8 minutes 16 seconds


 (4) How long does it take for the light rays from the moon to reach the earth?

 = 1.3 seconds


 (5) Which planet is closest to the Sun?

 = Mercury

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

श्लोक

यस्मिन् देशे न सम्मानो न वृत्तिर्न च बान्धवाः।

न च विद्यागमोऽप्यस्ति वासस्तत्र न कारयेत्।।

:-ज्या देशात मान नाही, उपजीविका नाही आणि नातेवाईकही नाहीत.

 तेथे ज्ञानाचा प्रवेश नाही आणि तेथे कोणी निवास करू नये.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: