डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शालेय परिपाठ दिवस १५४ वा

 चला सोपा करूया परिपाठ

*दिवस 154 वा*

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

 दिनांक.१८/०१/२०२४ 

भारतीय सौर २७, पौष शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.

वार:- गुरूवार

अयन-उत्तरायण

ऋतू - हेमंत ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलाखर "

मराठी महिना पौष शु ८

मकरसंक्रांत

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚


Today's almanac

Date 18/01/2024

 Indian Solar 27, Paush Shaka 1945 (This date is according to Indian Solar Calendar which is the official calendar of India. This information will be given from today.

 Day:Thursday

 Ayana-Uttarayana

 Ritu - Hemant Ritu

 The holy month of Muslims "Jamadilakhar"

Marathi month Paush Shu.8

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

गुरुवार, 18 जानेवारी 2024

सूर्योदय 07:10, 

खगोलीय दुपार: 12:45, 

सूर्यास्त: 18:20, 

दिवस कालावधी: 11:10,

रात्र कालावधी: 12:50.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सुविचार

“मी काहीतरी चांगलं करेल हा विश्वास आणि मी काहीतरी चांगलं करेलच हा आत्मविश्वास.”

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

दिनविशेष

१९९९: नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.


२००५: एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनाचे अनावरण करण्यात आले.


आजची म्हण व अर्थ


आंधळे दळते नि कुत्रे पिठं खाते- एकाने मेहनत करायची व दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यायचा.


The blind grind and the dogs eat flour - one would work hard and the other would take advantage of it.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोडे

 असा कोण आहे ज्याला बडवताना लोकांना खूप मज्जा येते?

उत्तर : ढोल

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सामान्य ज्ञान

1)महात्मा गांधी यांना बापू ही उपाधी कोणी दिली?

उत्तर : सरोजिनी नायडू


2) महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली?

उत्तर : सुभाषचंद्र बोस


3) महात्मा गांधी यांना मलंग बाबा ही उपाधी कोणी दिली होती?

उत्तर : खान अब्दुल गफार खान


4) महात्मा गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली होती?

उत्तर : रवींद्रनाथ टागोर आणि श्रद्धानंद स्वामी


5) गुगल क्लासरूम योजनेची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर: महाराष्ट्र

general knowledge

 1) Who gave the title Bapu to Mahatma Gandhi?

 Answer: Sarojini Naidu


 2) Who gave the title Father of the Nation to Mahatma Gandhi?

 Answer: Subhash Chandra Bose


 3) Who gave the title Malang Baba to Mahatma Gandhi?

 Answer : Khan Abdul Ghaffar Khan


 4) Who gave the title Mahatma to Mahatma Gandhi?

 Answer : Rabindranath Tagore and Shraddhananda Swami


 5) Which was the first state to implement the Google Classroom scheme?

 Answer: Maharashtra


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

बोधकथा

चाकावरील माशी

एक घोडागाडी जोरात चालली असता तिच्या चाकावर बसून एक माशी स्वतःशीच म्हणाली, 'मी किती धूळ उडवते आहे !' काही वेळाने ती माशी घोड्याच्या पाठीवर बसली व पुन्हा आपल्याशीच म्हणाली, 'घोड्याला पळायला लावणारं माझ्यासारखं दुसरं कोणी आहे का ?'


तात्पर्य


- दुसर्‍याने केलेल्या कामाचे श्रेय आपल्याकडे घेउन त्याबद्दल बढाई मारीत बसण्याची बर्‍याच लोकांना सवय असते.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

श्लोक

हिताकारणे बोलणे सत्य आहे।

हिताकारणे सर्व शोधुनि पाहें॥

हितकारणे बंड पाखांड वारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: