डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शालेय परिपाठ दिवस 150 वा

 चला सोपा करूया परिपाठ

*दिवस 150 वा*


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

 दिनांक.१२/०१/२०२४ 

भारतीय सौर २१, पौष शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.

वार:- शुक्रवार

अयन-उत्तरायण

ऋतू - हेमंत ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलाखर "

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

Today's almanac

Date 12/01/2024

 Indian Solar 21, Paush Shaka 1945 (This date is according to Indian Solar Calendar which is the official calendar of India. This information will be given from today.

 Day:Friday

 Ayana-Uttarayana

 Ritu - Hemant Ritu

 The holy month of Muslims "Jamadilakhar"

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

शुक्रवार, 12 जानेवारी 2024

सूर्योदय 07:10, 

खगोलीय दुपार: 12:43, 

सूर्यास्त: 18:16, 

दिवस कालावधी: 11:06, 

रात्र कालावधी: 12:54.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सुविचार

कष्ट इतक्या शांततेत करा, की यश हमखास

धिंगाणा घालेल.


Good thought

“Genius is 10% inspiration, 90% perspiration.”

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

दिनविशेष

१५९८: राजमाता जिजाऊ जयंती (मृत्यू: १७ जून १६७४)

१८६३: स्वामी विवेकानंद जयंती– भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे तत्त्वज्ञ, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य, गुरुंची स्मृती चिरंतन राहावी यासाठी त्यांनी ’रामकृष्ण मिशन’ची स्थापना केली. (मृत्यू: ४ जुलै १९०२)



१९८४: स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी या दिवशी “राष्ट्रीय युवा दिवस” म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.


२००५: राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

special day

 1598: Rajmata Jijau Jayanti (died: 17 June 1674)

 1863: Swami Vivekananda Jayanti – A disciple of Ramakrishna Paramahansa, the philosopher who spread Indian philosophy around the world, he established the 'Ramakrishna Mission' to perpetuate the Guru's memory.  (Died: 4 July 1902)



 1984: Swami Vivekananda's birthday was announced to be celebrated as "National Youth Day" every year.


 2005: Establishment of National Knowledge Commission

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

आजची म्हण व अर्थ

असतील शिते तर जमतील भुते - आपल्याजवळ पैसे असे तोवर मित्रांची वाण नसते.


Proverb

All that glitteres is not gold -चकाकते ते सर्व सोने नसते.


कोडे

ऊन बघता मी येतो, सावली पाहता मी लाजतो,

वाऱ्याचे स्पर्श होताच मी नाहीसा होतो. सांगा मी कोण?

उत्तर : घाम

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

बोधकथा


वाकडे झाड

एका अरण्यात इमारतीला उपयोगी पडणार्‍या झाडांची लागवड केली होती. ती सगळी झाडे अगदी उंच व सरळ वाढली होती. त्यातील फक्त एकच झाड वाकडे होते व ते इमारतीला उपयोगी पडणारे नव्हते. त्याच्याकडे पाहून इतर झाडे मोठ्याने हसून वेडेवाकडेपणाबद्दल त्याची चेष्टा करत. त्या अरण्याच्या मालकाने एकदा नवीन घर बांधण्याचे ठरविले व त्यासाठी लाकडाचा उपयोग होइल अशी सगळी झाडे तोडण्याचा हुकूम नोकरांना दिला. त्याप्रमाणे नोकराने ते वाकडे झाड सोडून सगळी झाडे तोडून टाकली.


तात्पर्य


- ज्या गुणामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. तो गुण अंगी नसला तर त्याबद्दल वाईट वाटू नये.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सामान्य ज्ञान

1)भारतामध्ये सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात?

उत्तर : राष्ट्रपती


2) रातांधळेपणा कोणत्या विटामिन च्या कमतरतेमुळे होतो?

उत्तर : व्हिटॅमिन A



3) पोंगल कोणत्या राज्याचा सण आहे?

उत्तर : तामिळनाडू


4) गिधा आणि भांगडा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहेत?

उत्तर : पंजाब


5) टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला?

उत्तर : जॉन लोगी बेअर्ड

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

general knowledge

 1) Who is the Supreme Commander of the Armed Forces in India?

 Answer: President


 2) Night blindness is caused by deficiency of which vitamin?

 Answer: Vitamin A



 3) Pongal is a festival of which state?

 Answer: Tamil Nadu


 4) Gidha and Bhangra are folk dances of which state?

 Answer: Punjab


 5) Who invented television?

 Answer: John Logie Baird

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

श्लोक

सुखासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे।

 वशिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे।।

 कवी वाल्मिकी सारखा मान्य ऐसा।

 नमस्कार माझा तया रामदासा।।

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: