डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रातील युवक व युवतींना सुवर्ण संधी

 संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रातील युवक व युवतींना सुवर्ण संधी

Notification for admission to SPI

army service


सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, (मुले) छत्रपती संभाजीनगर


सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, (मुली) नाशिक

संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवक व युवती जास्तीत जास्त संख्येने जावे, ह्यासाठी महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे मुलांसाठी व नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे.


2. जून २०२४ मध्ये सुरू होणा-या छत्रपती संभाजीनगर येथील मुलांच्या ४८ व्या तुकडीसाठी व नाशिक येथील मुलींच्या दुस-या तुकडीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.


3. पात्रताः- (अ) अविवाहित (मुलगा / मुलगी). (ब) महाराष्ट्राचे अधिवासी (Domicile) तसेच कर्नाटक राज्यातील फक्त बिदर, बेळगावी अणि कारवार जिल्हयाचे अधिवासी. (क) जन्म तारीख ०२ जानेवारी २००७ ते ०१ जानेवारी २०१० च्या दरम्यान. (ड) मार्च / एप्रिल / मे २०२४ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेला बसणारा / बसणारी. (इ) जून २०२४ मध्ये इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावे.

3. शारीरिक पात्रता:- सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी पात्र असावे. UPSC ने NDA आणि INA साठी दिलेल्या सर्व शारीरिक निकषांस पात्र असावे. हे निकष UPSC तथा संस्थेच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. काही प्रमुख निकष पुढीलप्रमाणे: उंची कमीत कमी १५७ से.मी. वजन -४३ कि.ग्रा. रातांधळेपणा किंवा रंगांधळेपणा नसावा. मुलांसाठी छाती न फुगवता ७४ से.मी. फुगवून ७९ से.मी. NDA / NA प्रवेशासाठी UPSC च्या आधिसूचनेनुसार डोळयांची क्षमता असावी.


लेखी परीक्षा आणि मुलाखत : पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा इंग्रजी माध्यमातून २८ एप्रिल २०२४ रोजी विविध केद्रांवर घेतली जाईल. 

परीक्षेमध्ये एकाच प्रश्नपत्रिकेत ६०० मार्काचे बहुपर्यायी Multiple Choice Questions, ७५ प्रश्न गणिताचे आणि ७५ प्रश्न सामान्यज्ञान General Ability Test (GAT) असे एकूण १५० प्रश्न असतील. प्रत्येक योग्य उत्तराला (४) गुण व चुकीच्या उत्तरास (१) गुण मिळतील. लेखी परीक्षा साधारणतः इयत्ता ८ वी ते १० वीच्या स्टेट स्टेट बोर्ड व सी.बी.एस.ई. च्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.

मुलांसाठी ऑनलाईन अर्ज www.spiaurangabad.com या संकेत स्थळावर आणि मुलींसाठी ऑनलाईन अर्ज www.girlspinashik.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. परीक्षा शुल्क रूपये ४५०/- (परत न करता येण्याजोगे) ऑनलाईन फक्त क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेटबँकीग इत्यादी व्दारे भरावे. डिमांड ड्राफ्ट किंवा चलानव्दारे भरलेले परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही. प्रवेश अर्ज संस्थेच्या अटी व शर्ती नुसार भरलेला नसल्यास अर्ज नामंजूर होइल, तसेच प्रवेश परीक्षा शुल्क परत मिळणार नाही.


و.

प्रवेश अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख: २९ फेब्रुवारी २०२४ संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत.

हॉल तिकीट:- दिनांक १० एप्रिल २०२४ सकाळी १०:०० वा. नंतर संस्थेच्या संकेत स्थळावरून डाऊनलोड करून घेता येतील.

९. परीक्षा संबधीत सूचनांसाठी मुलांनी www.spiaurangabad.com

 मुलींनी www.girlspinashik.com हे संकेत स्थळ वेळोवेळी तपासावे. इतर कोठेही हया बाबत सूचना दिल्या जाणार नाहीत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: