डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शालेय परिपाठ दिवस 156 वा

 चला सोपा करूया परिपाठ 

*दिवस 156 वा*

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

 दिनांक.२०/०१/२०२४ 

भारतीय सौर २९, पौष शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.

वार:- शनिवार

अयन-उत्तरायण

ऋतू - हेमंत ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलाखर "

मराठी महिना पौष शु १०


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚


Today's almanac

Date 20/01/2024

 Indian Solar 29, Paush Shaka 1945 (This date is according to Indian Solar Calendar which is the official calendar of India. This information will be given from today.

 Day:Friday

 Ayana-Uttarayana

 Ritu - Hemant Ritu

 The holy month of Muslims "Jamadilakhar"

Marathi month Paush Shu.10

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

शनिवार, 20 जानेवारी 2024

सूर्योदय 07:10, 

खगोलीय दुपार: 12:45, 

सूर्यास्त: 18:21, 

दिवस कालावधी: 11:11, 

रात्र कालावधी: 12:49.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सुविचार

“तुम्हाला आयुष्यात एकच गोष्ट यश मिळवण्यापासून

अडवू शकते ती म्हणजे हरण्याची भीती.”


 "only  one thing can stop you in life to succeed

 And that  is the fear of losing.”

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

दिनविशेष

१९५७: आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलालनेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करुन अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट (सध्याचे नाव भाभा अणुसंशोधन केंद्र) या संस्थेची स्थापना करण्यात आली.

1957: Asia's first nuclear reactor was dedicated to the country by Prime Minister Pandit Jawaharlal Nehru and the Atomic Energy Establishment (now known as Bhabha Atomic Research Centre) was established.



१९९८: संगीत क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा ’पोलार संगीत पुरस्कार’ विख्यात सतारवादक पं. रविशंकर यांना जाहीर


1998: The 'Polar Sangeet Award', which is considered the Nobel in the field of music, was awarded to famous satarist Pt.  Announced to Ravi Shankar


 

१९९९: गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर


1999: Dnyanpith Award announced to Girish Karnad

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

आजची म्हण व अर्थ


उचलली जीभ लावली टाळ्याला - अविचाराने वागणे .


कोडे

असे काय आहे ज्याला कापल्यावर लोक गाणे म्हणण्यास सुरुवात करतात?

उत्तर : वाढदिवसाचा केक

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

Puzzle

What is it that people start singing when cut?

 Answer: Birthday cake

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सामान्य ज्ञान

1)प्रत्येक घरात एलपीजी गॅस जोडणी असणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : हिमाचल प्रदेश


2) एथिकल कृत्रिम बुदिधमत्ता, ब्लॉकचेन आणि सायबर सुरक्षा धोरणांचे अनावरण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? 

उत्तर : तमिळनाडू


3) भारतात लसीकरणाची परवानगी मागणारी पहिली कंपनी कोणती?

उत्तर : फायझर


4) आयपीएलमध्ये खेळणारा पहिला अमेरिकन खेळाडू कोण होता?

उत्तर : अली खान


5) एकाच हंगामात २० गोल करणारा पहिला फुटबॉलपटू कोण होता?

उत्तर : लिओने मेस्सी


General knowledge

1)Which state was the first to have LPG gas connection in every house?

 Answer: Himachal Pradesh


 2) Which is the first state in India to unveil ethical artificial intelligence, blockchain and cyber security policies?

 Answer: Tamil Nadu


 3) Which is the first company to seek approval for vaccination in India?

 Answer: Pfizer


 4) Who was the first American player to play in IPL?

 Answer: Ali Khan


 5) Who was the first footballer to score 20 goals in a single season?

 Answer: Leone Messi

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

बोधकथा


वांव मासा व साप

वांव  नावाचा एक मासा आहे. त्याचा आकार सापासारखा असतो. त्या जातीचा एक मासा एकदा एका सापाला म्हणाला, 'अरे, तुझा नि माझा आकार इतका सारखा आहे की, त्यावरून तुझं आणि माझं नक्की काहीतरी नातं असलं पाहिजे असं मला वाटतं. पण लोक मलाच तेवढं पकडून नेतात पण तुझ्या वाटेला कोणीही जात नाही. याचं कारण काय ?' साप त्यावर म्हणाला, 'मित्रा, याचं कारण असं की लोक माझ्या वाटेला गेले तर मी त्यांना उलट अशी शिक्षा करतो की त्यामुळे त्यांना चांगलीच आठवण राहावी.


तात्पर्य


- त्रास देणार्‍या माणसाला नमून राहणे म्हणजे त्याला त्रास देण्याच्या कामी उत्तेजन देणे होय.


fish and snake

 There is a fish called Vam.  Its shape is like a snake.  A fish of that species once said to a snake, 'Oh, you and I are so similar in size that I think you and I must be related.  But people grab me so much but no one goes your way.  What is the reason for this?'  The snake said, 'Friend, this is because if people go my way, I will punish them in a way that they will remember well.


 meaning


 - To imitate a harasser is to encourage him to harass.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

श्लोक

देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।

मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥

मना चंदनाचे परी त्वां झिजावे।

परी अंतरीं सज्जना नीववावे।।

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: