चला सोपा करूया परिपाठ
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आजचे पंचांग
दिनांक.०५/०१/२०२४
भारतीय सौर १४, पौष शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.
वार:- शुक्रवार
अयन-उत्तरायण
ऋतू - हेमंत ऋतू
मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलाखर "
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
Today's almanac
Date 05/01/2024
Indian Solar 14, Paush Shaka 1945 (This date is according to Indian Solar Calendar which is the official calendar of India. This information will be given from today.
Day:-Friday
Ayana-Uttarayana
Ritu - Hemant Ritu
The holy month of Muslims "Jamadilakhar"
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
गुरुवार, 05 जानेवारी 2024
सूर्योदय 07:08,
खगोलीय दुपार: 12:39,
सूर्यास्त: 18:11,
दिवस कालावधी: 11:03,
रात्र कालावधी: 12:57.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*सुविचार*
नेहमी तीन गोष्टी देत राहा. मान, ज्ञान, आणि दान.
दिनविशेष
१९४९: पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरू झाली.
१९४३: अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १८६४)
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
म्हण
चिखलात दगड टाकला आणि अंगावर शिंतोडे घेतला स्वतःच्याच हाताने स्वतःची बदनामी करून घेणे.
कोडे
जांभळा झगा अंगावर,मुकुट याच्या डोक्यावर
:-वांगे
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
बोधकथा
खऱ्या खोट्याची पारख
एका सोनाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले होते. त्यांच्याकडे खाण्यापिण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. एके दिवशी सोनाराच्या पत्नीने, आपल्या मुलाला नीलमणीचा एक हार दिला आणि म्हणाली- "बेटा, हा हार घेऊन तुझ्या काकांच्या दुकानात जा आणि त्यांना सांग की हा हार विका व आम्हाला काही पैसे द्या."
मुलगा तो हार घेऊन काकांच्या दुकानात गेला. काकांनी त्या हाराकडे बारकाईने पाहिले आणि म्हणाले - "बेटा, आईला सांग की सध्या बाजारात खूप मंदी आहे. थोडे दिवस थांबून नंतर तो विकल्यास, तुम्हाला चांगला भाव मिळेल." त्याला थोडे पैसे देत त्याचे काका म्हणाले, “तू उद्यापासून माझ्याबरोबर दुकानात बसत जा.”
दुसऱ्या दिवसापासून तो मुलगा रोज दुकानात जाऊ लागला आणि तिथे बसून हिर्यान्ची आणि रत्नांची पारख कशी करायची, ते शिकू लागला.
थोड्याच दिवसात, तो हिऱ्यांचा मोठा पारखी झाला. आपल्या हिऱ्यांची पारख करवून घेण्यासाठी, दूर -दूरवरून लोकं त्याच्याकडे येऊ लागले.
एके दिवशी त्याचे काका त्याला म्हणाले, "बेटा, तुझ्या आईकडून तो हार घेऊन ये आणि तिला सांग की आता बाजारात खूप तेजी आहे, त्याला चांगला भाव मिळेल."
आईकडून तो हार घेऊन, त्याने स्वत:च त्याची पारख केली असता तो हार नकली असल्याचे त्याला आढळून आले. त्याला आश्चर्य वाटले, की काका स्वत: हिऱ्याचे व रत्नांचे मोठे पारखी आहेत... मग त्यांनी आम्हाला हे का सांगितले नाही?
मुलगा तो हार घरीच ठेवून तसाच दुकानात परत आला.
काकांनी विचारले, "अरे तू हार का आणला नाहीस?" तो म्हणाला, "काका, तो हार तर नकली आहे... परंतु तुम्ही माझ्यापासून हे का लपवून ठेवलेत?"
तेव्हा काका म्हणाले, "जेव्हा तू पहिल्यांदा हार आणला होतास, तेव्हा जर मी तो हार नकली आहे असं सांगितलं असतं, तर तुला असं वाटलं असतं की आज आमच्यावर वाईट वेळ आली आहे, म्हणून काका मला असं सांगत आहेत.
पण आज जेव्हा तुला खरं काय आणि खोटं काय, हे पारखण्याचे ज्ञान झाले आहे, तेव्हा तुला समजलेच असेल की तो हार खरोखरीच नकली आहे. त्यावेळी खरं बोलण्यापेक्षा, नातं सांभाळणं, हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं."
सत्य हे आहे की या जगात, खऱ्या ज्ञानाशिवाय आपण जो काही विचार करतो, पाहतो आणि जाणतो ते चुकीचे आहे. आणि म्हणूनच अशा गैरसमजुतींना बळी पडून आपल्या नात्यात दुरावा निर्माण होतो आणि आपलं आयुष्य भरकटायला लागतं.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
सामान्य ज्ञान
०१) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ?
- अहमदनगर.
०२) महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली ?
- १ मे १९६०.
०३) महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीचे नाव काय आहे ?
- नागपूर.
०४) महाराष्ट्र राज्याची विभागणी किती प्रशासकीय विभागात केली आहे ?
- सहा.
०५) महाराष्ट्राच्या समुद्र किना-याची लांबी किती किलोमीटर आहे ?
- ७२० किलोमीटर.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
श्लोक
जयाच्या शिरी केशरी रंग शोभे
दुजा पांढरा पाहता चित्त लोभे
हरित तो तिचा शांती देई मनाला
नमस्कार माझा तिरंगी ध्वजाला
Thursday, 05 January 2024
Sunrise 07:08,
Astronomical Noon: 12:39,
Sunset: 18:11,
Day Duration: 11:03,
Night duration: 12:57.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*Good Thought*
Always give three things. Honor, knowledge, and charity.
special day
1949: National Defense Initiative (NDA) started in Pune.
1943: American botanist, educator, explorer and scientist George Washington Carver died. (Born: 1 February 1864)
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
general knowledge
01) Which is the largest district in Maharashtra in terms of area?
- Ahmednagar.
02) When was Maharashtra state formed?
- 1 May 1960.
03) What is the name of the vice capital of Maharashtra state?
- Nagpur.
04) Maharashtra state is divided into how many administrative divisions?
- Six.
05) How many kilometers is the length of the sea coast of Maharashtra?
- 720 kilometers.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.