चला सोपा करूया परिपाठ
*दिवस 149 वा*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आजचे पंचांग
दिनांक.११/०१/२०२४
भारतीय सौर २०, पौष शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.
वार:- गुरूवार
अयन-उत्तरायण
ऋतू - हेमंत ऋतू
मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलाखर "
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
Today's almanac
Date 11/01/2024
Indian Solar 20, Paush Shaka 1945 (This date is according to Indian Solar Calendar which is the official calendar of India. This information will be given from today.
Day:Thursday
Ayana-Uttarayana
Ritu - Hemant Ritu
The holy month of Muslims "Jamadilakhar"
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
सूर्योदय 07:10,
खगोलीय दुपार: 12:42,
सूर्यास्त: 18:15,
दिवस कालावधी: 11:05,
रात्र कालावधी: 12:55.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सुविचार
“कोणीही तुमच्यासोबत नसेल,
तर घाबरुन जाऊ नका कारण
उंच उडणारे गरुड हे कमीच असतात.”
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
दिनविशेष
१९२२: मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.
२००९: स्लमडॉग मिलियनर या चित्रपटाला ६६ वा. गोल्डन ग्लोब अवार्ड मिळाला.
१८९८: ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि. स. खांडेकर यांचा जन्म.
१९६६: स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन झाले त्यांना मरणोत्तर ’भारतरत्न’ सन्मानाने गौरविण्यात आले होते. (जन्म: २ आक्टोबर १९०४)
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
आजची म्हण व अर्थ
अति शहाणा त्याचा बैल रिकामा - अति शहाणपण नुकसानकारक ठरते.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
कोडे
मी चालले राग राग,तु का ग माझ्या माग माग…
उत्तर : सावली
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
*बोधकथा*
सिंह आणि गाढव
एकदा एका गाढवाने एका सिंहाला उगाचच शिव्या दिल्या.
त्या ऐकून सिंहाला खूप राग आला.
परंतु शिव्या देणारा गाढव आहे हे पाहाताच त्याने आपला राग आवरला आणि त्या गाढवाकडे किंचितही लक्ष न देता तो सिंह निघून गेला.
तात्पर्य - जे थोर असतात ते कधीही क्षूद्र लोकांनी केलेल्या निंदेकडे लक्ष देत नाहीत.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
सामान्य ज्ञान
०१) बोधी म्हणजे काय ?
- सर्वोच्च ज्ञान.
०२) भारतातील सर्वात लहान राज्य (क्षेत्रफळाने) कोणते आहे ?
- गोवा.
०३) मडक्यांच्या समूहाला काय म्हणतात ?
- उतरंड.
०४) महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोठे आहे ?
- मुंबई.
०५) भारतातील सर्वात मोठा जिल्हा (क्षेत्रफळ) कोणता आहे ?
- कच्छ.(गुजरात)
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।।,
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.