डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शालेय परिपाठ दिवस १५३ वा

 चला सोपा करूया परिपाठ

*दिवस 153 वा*

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

 दिनांक.१७/०१/२०२४ 

भारतीय सौर २६, पौष शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.

वार:- बुधवार

अयन-उत्तरायण

ऋतू - हेमंत ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलाखर "

मराठी महिना पौष शु ७

मकरसंक्रांत

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

Today's almanac

Date 17/01/2024

 Indian Solar 26, Paush Shaka 1945 (This date is according to Indian Solar Calendar which is the official calendar of India. This information will be given from today.

 Day:Wednesday

 Ayana-Uttarayana

 Ritu - Hemant Ritu

 The holy month of Muslims "Jamadilakhar"

Marathi month Paush Shu.7

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

बुधवार, 17 जानेवारी 2024

सूर्योदय 07:10, 

खगोलीय दुपार: 12:44,

 सूर्यास्त: 18:19, 

दिवस कालावधी: 11:09,

 रात्र कालावधी: 12:51.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सुविचार

गोड आवाजात किमया असते ,ज्याच्या आवाजात गोडवा,त्याला समस्या सोडविण्याचा त्रासच नाही


दिनविशेष

जागतिक दिवस:

जागतिक धर्म दिन

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

महत्त्वाच्या घटना


१६०१: आजच्या दिवशी मुघल सम्राट अकबर ने असीरगढ येथे असलेल्या किल्यात प्रवेश केला.


१७७३: कॅप्टन जेम्स कुक यांनी अंटार्क्टिक वृत्त पार केले.


१९४६: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council) पहिली बैठक झाली.


१९५६: बेळगाव – कारवार आणि बिदर या जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा


१९८९: जे. के. बजाज हे उत्तरी ध्रुवावर जाणारे पहिले भारतीय ठरले.


२००१: अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील ’सूर्या पुरस्कार’ शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले यांना जाहीर.


१९१२: रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोहचले.


१९४१: नेताजी सुभाष चंद्र बोस ह्यांचे जर्मनी ला प्रयाण

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

आजची म्हण व अर्थ

आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे - अपेक्षेपेक्षा किती तरी अधिक फायदा होणे.

A blind man asks for one eye, God gives two eyes - to benefit much more than expected.


कोडे

रात्री 3 ठिकाणी आग  लागली आहे. 1- मंदिर 2- शाळा 3- दवाखाना सांगा सर्व प्रथम अँबुलन्स कोणती आग विझवेल?

उत्तर : अँबुलन्स आग विझवित नाही.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

बोधकथा


एक वडाचे झाड होते. 


त्याच्या आजूबाजूला हिरवळ होती, गवत होते. 


ते झाड त्या गवताला हिणवुन म्हणायचे “अरे काय तुमची पद्धत? तिकडुन वारा आला कि वाकले इकडे, इकडून आला कि वाकले तिकडे.. मी बघा माझ्या जागी स्थिर असतो. त्यामुळे लोक माझा आसरा घ्यायला येतात.”


काही दिवसांनी एक मोठे चक्रीवादळ आले. त्याच्या जोराने अनेक झाडे उन्मळून पडली. वटवृक्षाची सुद्धा तीच गत झाली. 


वादळ ओसरल्यावर गवत मात्र शाबुत होते. 


कधी कधी मोडेन पण वाकणार नाही असा ताठर बाणा आपले जास्त नुकसान करतो. 

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सामान्य ज्ञान


1) भारतात नोट बंदी केव्हा झाली?

उत्तर : 8 नोव्हेंबर 2016


2) पुलवामा हल्ला केव्हा झाला?

उत्तर : 14 फेब्रुवारी 2019


3) जम्मू काश्मीर मध्ये 370 हे कलम केव्हा हटवले?

उत्तर : 5-8-2019



4) राम मंदिर चा निर्णय केव्हा झाला?

उत्तर : 9 नोव्हेंबर 2019


5) जगातील सर्वात पहिला कोरोणा रुग्ण कोठे आढळला?

उत्तर : 17 नोव्हेंबर 2019 मध्ये चीन येथे

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

श्लोक

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।

पुढे वैखरी राम आधी वदावा॥ 

सदाचार हा थोर सांडूं नये तो। 

जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: