डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शालेय परिपाठ दिवस 161 वा

 *चला सोपा करूया परिपाठ*


*दिवस 161 वा*

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

 दिनांक.२९/०१/२०२४ 

भारतीय सौर ७, माघ शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.

वार:-सोमवार

अयन-उत्तरायण

ऋतू - हेमंत ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना रज्जब

मराठी महिना माघ शु ५


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚


Today's almanac

Date 29/01/2024

 Indian Solar 7, Magh Shaka 1945 (This date is according to Indian Solar Calendar which is the official calendar of India. This information will be given from today.

 Day:Thursday

 Ayana-Uttarayana

 Ritu - Hemant Ritu

 The holy month of Muslims "Rajjab"

Marathi month Magh Shu 5

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

 सोमवार, 29 जानेवारी 2024

सूर्योदय 07:09, 

खगोलीय दुपार: 12:47, 

सूर्यास्त: 18:26,

दिवस कालावधी: 11:17, 

रात्र कालावधी: 12:43.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सुविचार

आपली कामगिरी अव्वल दर्जाची करायची असेल तर छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरुवात करा.


Good Thought

 If you want your performance to be top notch, start paying attention to the little things.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

दिनविशेष


१२७४: संत निवृत्तीनाथ यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १२९७)

१७३७: अमेरिकन विचारवंत, राजकारणी आणि क्रांतिकारक थॉमस पेन यांचा जन्म. (मृत्यू: ८ जून १८०९)


१८६६: साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक रोमें रोलाँ यांचा जन्म. (मृत्यू: ३० डिसेंबर १९४४)


1274: Birth of Saint Nivrittinath.  (Died: 17 June 1297)

 〉

 1737: Birth of Thomas Paine, American intellectual, statesman and revolutionary.  (Died: 8 June 1809)


 〉

 1866: Birth of Romain Rollon, French writer, playwright and music critic, winner of the Nobel Prize in Literature.  (Died: 30 December 1944)

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

आजची म्हण व अर्थ

करावे तसे भरावे - वाईट कृत्य करणाऱ्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.


Today's proverb and meaning

 Pay as it is due - One who does bad deeds has to suffer the consequences.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोडे

तुम्ही मला पाण्यात पाहू शकता पण मी कधीही ओली होऊ शकत नाही, ओळखा पाहू मी कोण?

उत्तर : प्रतिबिंब


You can see me in the water but I can never get wet, guess who I am?

 Answer: Reflection

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सामान्य ज्ञान

1)मानवाच्या एकूण आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात ?

उत्तर : 52


2) मानवी शरीराराचे सर्वसामान्य तापमान किती सेल्सिअस  असते?

उत्तर : 37° सेल्सियस


3) कावीळ हा आजार शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम करतो ?

उत्तर : यकृत


4) मानवी शरीरात जंत कोठे आढळतात?

उत्तर : लहान आतड्यात


5) रक्तदान वर्षातून किती वेळा करता येते?

उत्तर : चार वेळा


general knowledge

 1) How many teeth are there in the total life of a human being?

 Answer : 52


 2) What is the normal temperature of the human body in Celsius?

 Answer : 37° Celsius


 3) Which organ of the body does Jaundice affect?

 Answer: Liver


 4) Where are worms found in the human body?

 Answer: In the small intestine


 5) How many times a year blood donation can be done?

 Answer: Four times

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

बोधकथा


एकदा एक माशी मुंगीसमोर फुशारक्या मारत होती. 


“मला जे वाटेल ते मी खायला जाते. वाटेल तिथे जाऊन बसते. देवाचा नैवेद्य मी देवाला दाखवण्याआधी चाखुन येऊ शकते. राजाच्या डोक्यावर जाऊन बसु शकते. कोणालाही मला काही करता येत नाही.”


मुंगीने हे ऐकुन घेतलं आणि म्हणाली. 


“अशा वाटेल तिथे मिळेल ते जाऊन खाण्यात कसला आलाय मोठेपणा? जशी तू अन्नावर जाऊन बसतेस तशी रस्त्यावर शेणात सुद्धा जाऊन बसतेस. त्यापेक्षा आमच्यासारखी मेहनत करून सगळ्यांनी मिळुन अन्न शोधणे, वारुळे बनवणे, त्यात अन्न जपुन ठेवणे कधीही चांगले.”


एकमेकांची मदत करत कष्टाची भाकरी मिळवणे नेहमीच चांगले असते.


Moral story

Once a fly was boasting to an ant.


 “I eat whatever I want.  Goes and sits wherever he wants.  God's offering can be tasted before I show it to God.  Can sit on the king's head.  No one can do anything to me.”


 The ant heard this and said.


 “What kind of magnanimity is there in going and eating whatever you think you can get?  Just as you sit on food, you also sit on dung on the road.  It is always better to work hard like us to find food together, make own home and preserve food in it.”


Moral:-

It is always better to earn bread by helping each other.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

श्लोक

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे।

मना बोलणे नीच सोशीत जावें॥

स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।

मना सर्व लोकांसि रे नीववावें॥

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: