डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शालेय परिपाठ दिवस 151 वा

 चला सोपा करूया परिपाठ

*दिवस 151 वा*

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

 दिनांक.१५/०१/२०२४ 

भारतीय सौर २४, पौष शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.

वार:- शुक्रवार

अयन-उत्तरायण

ऋतू - हेमंत ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलाखर "

मराठी महिना पौष शु ५

मकरसंक्रांत

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚


Today's almanac

Date 15/01/2024

 Indian Solar 24, Paush Shaka 1945 (This date is according to Indian Solar Calendar which is the official calendar of India. This information will be given from today.

 Day:Friday

 Ayana-Uttarayana

 Ritu - Hemant Ritu

 The holy month of Muslims "Jamadilakhar"

Marathi month Paush Shu.5

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सोमवार, 15 जानेवारी 2024

सूर्योदय 07:10, 

खगोलीय दुपार: 12:44, 

सूर्यास्त: 18:18, 

दिवस कालावधी: 11:08, 

रात्र कालावधी: 12:52.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सुविचार

सुविचार

“मी काहीतरी चांगलं करेल हा विश्वास आणि मी काहीतरी चांगलं करेलच हा आत्मविश्वास.”


Good thought

 “The belief that I will do something good and the confidence that I will definitely do something good.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

आजची म्हण व अर्थ

आपला हात जगन्नाथ - आपल्याला घेण्याची संधी मिळताच मुबलक घेणे.


Proverb

speech is silver and silence is gold. -बोलण्यापेक्षा मौन श्रेष्ठ

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोडे

दोन पाय मोठे दोन पाय लहान शेतात राबतो ताकद महान

उत्तर : ट्रॅक्टर

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

बोधकथा

शेतकरी आणि नदी

एका शेतकर्‍याला नदी पार करून जायचे होते, म्हणून पाण्याला उतार कोठे आहे हे पाहण्यासाठी तो नदीच्या काठावर खालीवर फिरू लागला. थोड्या वेळाने तो म्हणाला, 'जिथे पाणी संथ वाहतं तिथे ते फार खोल आहे व जिथे पाण्याचा फार आवाज ऐकू येतो तिथे ते अगदी उथळ आहे.'


तात्पर्य


- शांत वाटणारा अगदी आतल्या गाठीचा असल्याने त्याच्याकडून धोका असण्याचा जसा संभव असतो तसा बडबड्या आणि मोकळ्या मनाच्या माणसाकडून नसतो.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सामान्य ज्ञान

०१) भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे ?

- थर वाळवंट.(राजस्थान)


०२) ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

:-चंद्रपूर


०३) जगातील सर्वात उंच प्राणी कोणता आहे ?

- जिराफ.


०४) जगातील सर्वात लांब कालवा कोणता आहे ?

- सुवेझ.


०५) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे ?

- वॉशिंग्टन.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

General knowledge

01) Which is the largest desert in India?

 - Thar Desert.(Rajasthan)


 02)Where is Tadoba National Park?  :- -Chandrapur


 03) Which is the tallest animal in the world?

 - Giraffe.


 04) Which is the longest canal in the world?

 - Suez.


 05) Where is the headquarters of World Bank?

 - Washington.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

श्लोक

उपासनेला दृढ चालवावे।

भुदेव संतांशी सदा नमावे।।

सत्कर्म योगे वय घालवावे।

सर्वांमुखी मंगल बोलवावे।।


*आपणास व आपल्या परिवारास मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐💐*

*तिळगुळ घ्या,गोड बोला!*

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: