डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शालेय परिपाठ दिवस 145 वा

 *चला सोपा करूया परिपाठ*

*दिवस 145 वा*

3 सप्टेंबर 2019 ला माझा हा लेख राष्ट्रीय स्तरावर दैनिक लोकमत आवृत्तीमध्ये संपादकीय पानावर प्रकाशित झाला होता. याच लेखाला त्याच दिवशी राज्याचे  तत्कालीन  शिक्षण सचिव आदरणीय नंदकुमार साहेबांनी इंग्रजी व हिंदी अनुवादित करुन त्यांच्या  स्तरावरील देशभरात अधिकारी व शिक्षण क्षेत्रात संप्रेषित केला. इंग्रजी लेख दक्षिण व पुर्व भारतात तर हिंदी उत्तर भागात पाठवला. यात निश्चितच महाराष्ट्रातील  सुरु झालेले भविष्यवेधी शिक्षण दिसून येते. विशेष बाब ही की रणजितसिंह डिसले गुरुजींना ग्लोबल पुरस्कार मिळण्याआधी दिड वर्षा आधी हा लेख त्यांच्या कार्याचा गौरव करणारा ठरला त्याबद्दल सरांनी आनंद व्यक्त करत आभार ही मानले.              प्रकाशसिंग राजपूत  (सहशिक्षक )  जि. प.प्रा.शा. मुरूमखेडावाडी कें करमाड.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

 दिनांक.०६/०१/२०२४ 

भारतीय सौर १५, पौष शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.

वार:- शनिवार

अयन-उत्तरायण

ऋतू - हेमंत ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलाखर "

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚


Today's almanac

Date 06/01/2024

 Indian Solar 15, Paush Shaka 1945 (This date is according to Indian Solar Calendar which is the official calendar of India. This information will be given from today.

 Day:-saturday

 Ayana-Uttarayana

 Ritu - Hemant Ritu

 The holy month of Muslims "Jamadilakhar"


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

शनिवार, 06 जानेवारी 2024

सूर्योदय 07:08, 

खगोलीय दुपार: 12:40, 

सूर्यास्त: 18:12, 

दिवस कालावधी: 11:04, 

रात्र कालावधी: 12:56.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*सुविचार* 

स्वतःचा अवगुण शोधणे हीच गुणांची पूर्तता.

Good Thought

"Don't wait for the opportunity. Create it." – George Bernard Shaw

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

दिनविशेष

१९५९: भारतीय क्रिकेटपटू कपिलदेव निखंज यांचा जन्म.

१९६६: सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांचा जन्म.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

special day

 1959: Indian cricketer Kapildev Nikhanj was born.

 〉

 1966: Well-known composer A.  R.  Birth of Rahman.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

म्हणी/proverb

Birds of feather flock together -एकाच माळेचे मणी 

:;सारख्या विचाराचे व्यक्ती नेहमी सोबत असतात.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोडे

कुठ कुठ काडी 

पोटात नाडी 

राम जन्मला हात जोडी 

कृष्ण जन्मला हात जोडी

:- देव्हाऱ्यातील घंटी

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सामान्य ज्ञान

०१) भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य कोणते आहे ?

 - केरळ.


०२)  प्रसिद्ध मिनाक्षी मंदिर कोठे आहे ?

- मदुराई.(तामिळनाडू)

०३) ख्रिश्चन धर्मग्रंथाचे नाव काय आहे ?

- बायबल.


०४) राजमाता जिजाबाईंचे जन्मस्थान कोठे आहे ?

- सिंदखेड राजा,जि.बुलढाणा.(महाराष्ट्र)


०५) राष्ट्रपती भवन कोठे आहे ?

- दिल्ली.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

general knowledge

 01) Which is the most literate state in India?

  - Kerala.


 02) Where is the famous Meenakshi Temple?

 - Madurai.(Tamil Nadu)


 03) What is the name of the Christian scripture?

 - The Bible.


 04) Where is the birthplace of Rajmata Jijabai?

 - Sindkhed Raja, District Buldhana (Maharashtra)


 05) Where is Rashtrapati Bhavan?

 - Delhi.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

बोधकथा

एकदा एक म्हातारा सिंह खूप आजारी पडला. जंगलातील सर्व प्राण्यांना त्याने भेटायची इच्छा व्यक्त केली. त्यानं सर्व प्राण्यांना आपल्या गुहेत भेटण्यासाठी बोलावलं. सिंह म्हणाला मित्रांनो मी खूप आजारी आहे. आता माझं केव्हा बरं वाईट होईल हे सांगता येत नाही. कृपया तुम्हाला मी तयार केलेलं माझं मृत्युपत्र वाचून दाखवायचं म्हणतो. वनराजाच्या आदेशाने जंगलातले सर्व प्राणी एका नंतर एक येऊ लागले. देवरा आला कुत्रा आला माकडा आली घोडे अशाप्रकारे सर्वजण वनराजाच्या गुहेत शिरले.


काही वेळानंतर प्राण्यांचे येणे थांबले. वनराज सिंह मात्र अजूनही अनेकांची वाट बघत होता. तो म्हणाला अजून बरेच जण यायचे बाकी आहेत ते का बर आले नाहीत. सिंहाला काळजी वाटू लागली. त्याला राहवलं नाही. त्यांना गुहेच्या बाहेर जाऊन पाहिलं तर बाहेर एक कोल्हा उभा होता. शहाणे त्याला विचारले अरे तुम्ही असं बाहेरच का थांबला आत या ना तुमचीच वाट बघत होतो मी.



धूर्त कोल्हा म्हणाला महाराज गुहेत आत गेलेल्या सगळ्यांच्या पावलाचे ठसे पाहता मला असे लक्षात आले की जसे गुहेत जाण्याचे पावलांचे ठसे दिसले तसे ते बाहेर जाण्याचे पावलाचे ठसे कुठेच दिसले नाही. म्हणजे आज गुहेत गेलेला  कोणीही बाहेर परत आलं नाही.


धुर्त कोल्ह्याचं म्हणणं ऐकून सिंहाला राग आला. त्याने रागात मोठी डरकाळी फोडली. डरकाळी च्या आवाजाने सर्व प्राणी घाबरले. जीव मुठीत घेऊन पळू लागले.



हुशार कोल्हा , इतर प्राण्यांना म्हणाला कळलं तुम्हाला मी काय म्हणालो ते. शत्रूकडे जाणं सोपं असतं पण शत्रूच्या जाळ्यातून सुरक्षित परतण फार अवघड असतं.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

Story

One day, Molly the milkmaid had filled her pails with milk. Her job was to milk the cows and then bring the milk to the market to sell. Molly loved to think about what to spend her money on.


As she filled the pails with milk and went to market, she again thought of all the things she wanted to buy. As she walked along the road, she thought of buying a cake and a basket full of fresh strawberries.


A little further down the road, she spotted a chicken. She thought, “With the money I get from today, I’m going to buy my own chicken. That chicken will lay eggs; then I can sell milk and eggs and get more money!”


She continued, “With more money, I can buy a fancy dress and make all the other milkmaids jealous.” Out of excitement, Molly started skipping, forgetting about the milk in her pails. Soon, the milk started spilling over the edges, covering Molly.


Drenched, Molly said to herself, “Oh no! I will never have enough money to buy a chicken now.” She went home with her empty pails.


“Oh, my goodness! What happened to you?” Molly’s mother asked.


“I was too busy dreaming about all the things I wanted to buy that I forgot about the pails,” she answered.


“Oh, Molly, my dear. How many times do I need to say, ‘Don’t count your chickens until they hatch?’”


Moral

Don’t count on your good fortune before it has come about.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

श्लोक

अलसस्य कुतः विद्या अविद्यस्य कुतः धनम्। अधनस्य कुतः मित्रम् अमित्रस्य कुतः सुखम्।।

 :-आळशी लोकांना विद्या प्राप्त होत नाही,अज्ञानी लोकांना धन मिळत नाही,दरिद्री लोकांना मित्र नसतात आणि मित्र नसलेल्या लोकांना सुख नसते.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: