डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शालेय परिपाठ दिवस 158

 चला सोपा करूया परिपाठ

*दिवस 158 वा*



💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

 दिनांक.२४/०१/२०२४ 

भारतीय सौर २, माघ शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.

वार:-बुधवार

अयन-उत्तरायण

ऋतू - हेमंत ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना रज्जब

मराठी महिना पौष शु १४


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚


Today's almanac

Date 24/01/2024

 Indian Solar 2, Magh Shaka 1945 (This date is according to Indian Solar Calendar which is the official calendar of India. This information will be given from today.

 Day:Wednesay

 Ayana-Uttarayana

 Ritu - Hemant Ritu

 The holy month of Muslims "Rajjab"

Marathi month Paush Shu.14

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

 बुधवार, 24 जानेवारी 2024

सूर्योदय 07:10,

 खगोलीय दुपार: 12:46, 

सूर्यास्त: 18:23, 

दिवस कालावधी: 11:13, 

रात्र कालावधी: 12:47.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सुविचार

ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.


Good Thought


He who conquers his own mind conquers the world.


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

दिनविशेष


१९५०: भारताच्या संविधानावर स्वाक्षरी झाली


१९५१: प्रेम माथुर ह्या देशाच्या पहिल्या महिला पायलट बनल्या.


१९६६: भारताच्या तिसर्‍या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचा शपथविधी झाला.


२००२: भारतीय उपग्रह इनसेट-३ आपल्या कक्षेत स्थापित झाला.


१९६६: एअर इंडियाचे ’कांचनगंगा’ हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतात कोसळुन भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा मृत्यूमुखी पडले. (जन्म: ३० आक्टोबर १९०९)


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐


special day


 1950: Constitution of India is signed


 1951: Prem Mathur became the country's first woman pilot.


 1966: Indira Gandhi was sworn in as the third Prime Minister of India.


 2002: Indian satellite Inset-3 was placed into orbit.


 1966: Air India's 'Kanchanganga' plane crashed in the European Alps.  Homi Jahangir Bhabha died.  (Born: 30 October 1909)


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजची म्हण व अर्थ

एक ना धड भाराभर चिंध्या - एकाच वेळी अनेक गोष्ठी केल्याने सर्वच गोष्टी अर्धवट राहतात.


Today's proverb and meaning


 A load of rags - doing many meetings at the same time leaves everything half-baked.


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

कोडे

असा कोण आहे ज्याच्याकडे झोपण्यासाठी पलंग नाही, राहण्यासाठी महाल नाही आणि विशेष म्हणजे त्याच्याकडे एक रुपया सुद्धा नाही, तरीही तो राजा आहे.

उत्तर :  सिंह


Puzzle

 Who is he?

 He has no bed to sleep in,

 no palace to live in 

and most importantly not even a single rupee, yet he is a king.

 Answer: Lion

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐


सामान्य ज्ञान

1)केंद्राच्या कृषी विधेयकांविरोधात ठराव मांडणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : पंजाब


2) संपूर्णपणे डिजिटल, हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य कोणते?

उत्तर : केरळ


3) संपूर्ण ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करणारे पहिले विद्यापीठ कोणते?

उत्तर : दिल्ली विद्यापीठ


4) पहिले ट्रान्सजेंडर विदयापीठ कोठे आहे?

उत्तर : कुशीनगर (उत्तर प्रदेश)


5) पहिले ‘कासव पुनर्वसन केंद्र कोठे स्थापन केले आहे?

उत्तर : भागलपूर वनक्षेत्र (बिहार)


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

General knowledge

 1)Which state was the first to move a resolution against the Centre's agriculture bills?

 Answer: Punjab


 2) Which state was the first to have fully digital, high-tech classrooms?

 Answer: Kerala


 3) Which is the first university to introduce complete online admission process?

 Answer : University of Delhi


 4) Where is the first transgender university?

 Answer : Kushinagar (Uttar Pradesh)


 5) Where is the first 'Turtle Rehabilitation Centre' established?

 Answer : Bhagalpur Forest Area (Bihar)


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

बोधकथा

मूल्य श्रमप्रतिष्ठा


राजा कुवरसिंह श्रीमंत होते. त्यांना कुठल्याही गोष्टीची कमतरता नव्हती. परंतु त्यांचे स्वास्थ्य चांगले नव्हते. ते सतत चिंतीत राहत असत. कितीतरी वैद्यांनी त्यांच्यावर उपचार केले परंतु त्यांना काहीही लाभ झाला नाही. राजाचा आजार वाढत गेला. संपूर्ण नगरात ही बातमी पसरली.

             एक म्हातारा राजा जवळ गेला. तो म्हणाला, "महाराज मला आपल्या आजारावर उपचार करण्याची परवानगी द्यावी."

राजाने त्याला परवानगी दिली. तो म्हणाला," महाराज तुम्हाला एखाद्या सुखी माणसाचा सदरा मिळाला म्हणजे तुम्ही स्वस्थ व्हाल!"

म्हाताऱ्याचे बोलणे ऐकून सर्व दरबारी हसू लागले. मात्र राजा हसला नाही. त्याला वाटले इतके दिवस इतके उपचार करून झाले आता हाही एक उपचार करून बघू.

राजाच्या सेवकांनी सुखी माणसाचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांनी पुष्कळ ठिकाणी शोधले परंतु त्यांना सुखी माणूस भेटला नाही. प्रत्येक माणसाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचे, कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे दुःख होतेच.

सैनिक आणि सेवक कमी पडले असेल असा विचार करून राजा आता स्वतःच सुखी माणसाचा शोध घेण्यासाठी बाहेर पडला. खूप तपास केल्यानंतर तो एका शेतात जाऊन पोहोचला. ज्येष्ठ महिना सुरू होता. भर दुपारच्या उन्हात शेतकरी शेतात काम करत होता. राजाने त्याला विचारले, "का रे बाबा तू सुखी आहेस का?"

शेतकऱ्याच्या डोळ्यात तेज निर्माण झाले. चेहऱ्यावर आनंदी हास्य होते. भर उन्हातही त्याचा चेहरा चमकत होता. तो म्हणाला," ईश्वर कृपेने मला कोणतेही दुःख नाही." हे ऐकून राजा खूश झाला कारण त्याला शेवटी सुखी माणूस सापडला होता. आता त्याला सुखी माणसाचा सदराही भेटणार होता. तो त्याला सहज मागता येणार होता. सदरा मागण्यासाठी राजाने शेतकऱ्याकडे पाहिले मात्र शेतकऱ्याने फक्त धोतर घातलेले होते आणि त्याचे अंग घामाने डबडबले होते.

राजाने त्याला प्रश्न केला, "तुझ्या सुखी असण्याचे रहस्य काय? अशी कोणती गोष्ट आहे जी तुला कायम सुखात ठेवते?"

तेव्हा शेतकरी म्हणाला, "महाराज हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला एक दिवस माझ्याबरोबर राहावे लागेल."

राजाने मान्यता दर्शवली. दुसऱ्या दिवशी सकाळीच शेतकरी उठला व आपली भाकरी घेऊन कामाला निघाला. राजा ही त्याच्या पाठोपाठ उठून निघाला. त्याने दिवसभर शेतकऱ्याचे निरीक्षण केले. शेतकऱ्याचे शेतातील काम पिकांना पाणी देणे, गुरांची देखभाल, नांगरणी करणे, विहिरीचे पाणी काढणे, कुदळ चालवणे ही सर्व कामे राजा बघत होता. दुपारच्या वेळी त्याने जेवणाचा डब्बा काढला आणि राजालाही जेवणाचे आमंत्रण दिले. राजालाही भूक लागलेली होती दोघांनी मिळून जेवण केले. राजाला आश्चर्य वाटले रोज पंचपक्वान्नाचे जेवण त्याला नकोसे वाटत होते. आज मात्र त्याने भाजी भाकरी पोटभर खाल्ली.

संध्याकाळ झाल्यावर राजा शेतकऱ्या सोबत घरी आला तिथेही त्याचे निरीक्षण करणे चालूच होते. रात्री च्या जेवणानंतर शेतकऱ्याला शांतपणे झोपलेले बघून राजाला समजले की श्रमाच्या कारणामुळेच हा शेतकरी सुखी आहे.

त्या दिवसापासून त्याने आराम चैन सोडून परिश्रम करण्याचा संकल्प केला. व तो प्रत्यक्षात आचरणात आणला आणि काय आश्चर्य थोड्याच दिवसात राजाचा आजार नाहीसा झाला.


कथेतील बोध:- शरीर स्वास्थ्यासाठी शारीरिक व मानसिक श्रमाची गरज असते अशा श्रमाला योग्य प्रकारे प्रतिष्ठा देऊन श्रम केले तर माणूस आजारी पडणार नाही व हताशही होणार नाही .


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्लोक

उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् ।

वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र संततिः ॥

जो समुद्राच्या उत्तरेला आहे आणि हिमालयाच्या दक्षिणेला. त्या देशाचे नाव भारत असून तिथे राहणाऱ्या लोकांना भारतीय असे म्हणतात.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: