डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

सीसीटिव्ही कॅमेरांच्या माध्यमातून कडक देखरेख

नुकतीच शिक्षक भरती प्रक्रिया mpsc मार्फत विचाराधीन असतांना आता मात्र राज्यातील पेपर फुटीची  प्रकरणे लक्षात घेता आयोगाने मोठा निर्णय घेतलेला आहे.




 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे  घेण्यात येणाऱ्या परीक्षेला सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय आयोगाकडून घेण्यात आला आहे

प्रश्नपत्रिका वाटल्यावर काही मिनिटांतच ती व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांवरून बाहेर येणे, सामूहिक कॉपी याला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयोगाने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.


सीसीटिव्ही  कॅमेरांच्या माध्यमातून कडक देखरेख

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 ला सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. सीसीटिव्ही कॅमेरांच्या माध्यमातून कडक देखरेख ठेवण्यात येणार आहे. तसेच परीक्षेनंतर परीक्षेदरम्यानच्या चित्रीकरणाआधारे कोणत्याही प्रकारे गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारावर तसेच त्याला मदत करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारावई करण्यात येणार आहे.

शिक्षक विराट मोर्चा....पहा सविस्तर

उमेदवारी रद्द करणार

उमेदवारांवर उमेदवारी रद्द करण्यासह संबंधित कायद्यातील तरतुदींनुसार फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. तसेच परीक्षेकरीता नियुक्त कर्मचारी व आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन केल्यास त्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे. या अगोदर आयोगाने राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमाच्या संदर्भात काही संघटित अथवा असंघटित घटकांकडून आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.